logo

शिक्षणात तंत्रज्ञानासोबतच संस्कारांची जोड महत्त्वाची : तुषार डोडिया

Aima Media news network

सादिक शाह रायपूर

07-08-2025

शिक्षणात तंत्रज्ञानासोबतच संस्कारांची जोड महत्त्वाची : तुषार डोडिया

रायपूर | नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे, परंतु त्यासोबतच मुलांवर योग्य संस्कार करणे, तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन तुषार डोडीया यांनी केले. येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २ ऑगस्ट रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्रेमराज भाला हे होते. तर सल्लागार समिती अध्यक्ष मदन गवते, सदाशिव शिंदे, प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे, मुखाध्यापिका निर्मला खुर्दे, पालक प्रतिनिधी केशव तरमळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी रविवार आमच्या आवडीचा या गीतावर नृत्य सादर केले. त्यानंतर गीत मंचच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक वाटचालीवर आणि उपक्रमांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन सोनुने यांनी तर आभार प्रदर्शन संजय पिवटे यांनी केले.

5
706 views