थेपडे विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात संपन्न
जळगांव /प्रतिनिधी / दिनेश सोनवणे :
स्वा सै पं ध थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता जि जळगाव या विद्यालयात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना श्रीमती भावना चौधरी मॅडम यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य श्री जी डी बच्छाव सर यांनी शाळेमध्ये रक्षाबंधन साजरा का करावा. त्यामागील भावना स्पष्ट केली. विद्यालयातील पाचवी ते दहावी एकूण 22 वर्गातल्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधली सोबतच शिक्षकांना देखील विद्यार्थिनी व शिक्षिका भगिनी यांनी राखी बांधली. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळण्यास सांगितले. अशा पद्धतीने हा उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस जे पवार सर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.