शिवणे, उत्तमनगर, कोढवे-धावडे परिसरात कचऱ्यामुळे लोकांची जीव मुठीत धरून प्रवास.
एन डी ए रोड परिसरात नागरिक वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर लोकांची रहदारी ही त्यामुळे वाढली आहे. रोज साधारण हजारो गाड्या येजा करतात.
नागरिक वस्तीमुळे कचऱ्याची समस्या ही तेवढीच वेगाने वाढत आहे. महानगरपालिकेने रस्त्यालाच कचरा डेपो केला कां काय असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
नवभारत हायस्कुल चौकातून साधारण 500 मीटर च्या आत एक कचरा डेपो आहे. उत्तमनगर परिसरात मोरे पेट्रोल पंप समोर एक कचरा डेपो केला आहे आता हा अधिकृत आहे कां नाही? हा संशोधणाचा विषय आहे. पण तिथे पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या उभ्या असतात. त्या कचऱ्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, प्रचंड प्रमाणात दुर्गंधी व डासांच्या मुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. पण त्याच बरोबर कचऱ्यामुळे मोकाट जणांवरे जमा होऊ लागली आहेत व त्यामुळे रस्ता ब्लाक होत आहेच व एखाद्या जनावऱ्याने कुणाचा तरी जीव घेण्याची वाट पालिका पाहत आहे कां? हा प्रश्न उपस्थित होतो. जो पर्यत कचऱ्याचे नियोजन होत नाही तो पर्यंत याचा पाठपुरावा करीत राहील.