logo

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर

गडचिरोली, दि. ७ ऑगस्ट :
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन युवकांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन या दोन्ही रुग्णांची विचारपूस केली.

या भेटीदरम्यान सहपालकमंत्री जयस्वाल यांनी क्षितिज तुळशीदास मेश्राम व आदित्य धनंजय कोहपरे या दोन्ही अपघातग्रस्त युवकांशी थेट संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. “तुमच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील. शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी किंग्सवे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही सविस्तर चर्चा करून रुग्णांच्या सध्याच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतली. रुग्णांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला निर्देशही दिले.

अपघातानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि शासन यंत्रणा रुग्णांच्या सेवेत तत्पर असून राज्य सरकारकडून या घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे तसेच जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च शासन करणार आहे. अपघातातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही श्री जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

#gadchirolidistrict#advashishjaiswal#वैद्यकीय#सुविधा#health

97
4235 views