डॉ सचिन करोडपती मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात (५० कि. तांदूळ व नाश्ता )
दि.०७/०८/२०२५ वार : - गुरुवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळा पारोळा येथे चि.मंथन सचिन बडगुजर ( शिक्षण इंजीनियरिंग पुणे) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ सचिन बडगुजर (डेंटिस्ट पारोळा ) यांच्यावतीने आप्पासाहेब उमेश करोडपती (संस्थापक अध्यक्ष बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ, पारोळा ) यांच्या हस्ते मिष्ठांन्न खाऊ वाटप व ५० किलो तांदुळाची मदत दिली. आप्पासाहेब उमेश करोडपती यांचे स्वागत डॉ. योगेश महाजन (संस्थेचे अध्यक्ष) यांच्यावतीने शाळेचे शिक्षक रामकृष्ण शेलकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दीपक भावसार,राहुल शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.