logo

घणसोलीतील समस्यांवर मनसेचा थाळीनाद मोर्चा; पालिका अधिकाऱ्यांना इशारा

​नवी मुंबई: घणसोली परिसरातील विविध नागरी समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी (६ ऑगस्ट २०२५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) घणसोली 'F' विभाग कार्यालयावर 'थाळीनाद' मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
​शहरातील खराब रस्ते, पदपथ, आरोग्य सेवेचा अभाव आणि वाढत्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हा मोर्चा सकाळी १०:३० वाजता घणसोली डी मार्ट, सेक्टर ७ येथून सुरू झाला आणि घणसोली 'F' विभाग कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
​यावेळी, मनसेच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना घणसोलीतील समस्यांवर जाब विचारला. गजानन काळे साहेब यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले की:
​"शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष करणे आता सहन केले जाणार नाही. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे."
​"जर पालिका अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत घणसोलीतील समस्यांवर तोडगा काढला नाही, तर आज काढलेला मोर्चा हा फक्त सुरुवात आहे. यानंतर होणारे आंदोलन अधिक तीव्र असेल आणि महाराष्ट्र सैनिक थेट अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसतील."
​"प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास यापुढे शांत बसणार नाही."
​मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांची जाणीव करून देण्यात आली असून, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
​बातमीसाठी संपर्क:
​दत्तात्रय तुकाराम काळे
(सामाजिक मीडिया कार्यकर्ता, एआयएमए मीडिया फाउंडेशन प्रतिनिधी)
​मोबाईल: ८०८००७६२६२

13
3624 views