काॅन्टॅक्ट स्ट्रेसिंग शिक्षक समस्यांच्या बाबतीत पनवेल तालुका शिक्षक परिषदेकडून प्रशासनाला निवेदन
काॅन्टॅक्ट स्ट्रेसिंग शिक्षक समस्यांच्या बाबतीत पनवेल तालुका शिक्षक परिषदेकडून प्रशासनाला निवेदन
संपूर्ण जग कोरोना महामारी चा सामना करीत असताना शिक्षक वर्ग सुद्धा कोरोना योध्दा सारखं काम करताना दिसून येत आहे.पनवेल तालुक्यात गेले वीस-पंचवीस दिवसांपासून शिक्षक वर्ग कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चे काम करीत आहेत हे काम करीत असताना कधीकधी शिक्षकांचा संसर्ग बाधित व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो अशावेळी शिक्षकांना संरक्षित साहित्य मिळाव तसेच काही शिक्षक पर जिल्ह्यातून आपली सेवा बजावण्यासाठी पनवेल तालुक्यात येत असताना प्रवासामध्ये अनंत अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे या सर्व गोष्टींचा प्रशासनाने योग्य विचार विनिमय करून शिक्षक समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने पनवेल तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने नुकतेच तहसीलदार ,बीडिओ व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
अशी माहिती रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी दिली