परत धम्म ध्वज विटंबना झाली तर गाठ ऑल इंडिया पॅथरशी आहे.. मा. माधव दादा भालेराव जिल्हाध्यक्ष नांदेड
हसणाळ प .मु .ता. मुखेड जि. नांदेड या ठिकाणी गेल्या काही दिवसाखाली गावातील मनुवादी प्रवृत्तीच्या बांडगुळाने पंचशील ध्वजाची विटंबना केली होती. त्यावेळी सर्वप्रथम ऑल इंडिया पँथर सेनेने निषेध व्यक्त करत प्रशासनाला तातडीने कल्पना करून गावात घडलेल्या प्रकाराची तातडीने दखल घेण्यास भाग पाडले.गावातील सर्व नागरिक यांची प्रशासनाच्या माध्यमातून समोपचारिक बैठक घेण्यात आली. आज ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक सन्माननीय पँथर दिपकभाई केदार यांच्या आदेशाने ऑल इंडिया पँथर सेना नांदेड टीम हसणाळ या ठिकाणी जाऊन गावातील प्रतिष्ठित मंडळी, गावातील बौध्द उपासक -उपासिका, बालक-बालिका यांच्या सर्वांच्या उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून धम्म ध्वज अनावरण करण्यात आले. अनावरण प्रसंगी ऑल इंडिया पँथर सेना नांदेड च्या माध्यमातून मनुवादी प्रवृत्तीच्या बांडगुळांना थेट इशारा देण्यात आला यापुढे कदाचित पूनच धम्म ध्वजाची विटंबना झाल्यास परिपूर्ण पँथरशी गाठ असेल. यावेळी उपस्थित नांदेड जिल्हाध्यक्ष मा. माधवदादा भालेराव,जिल्हा संघटक केशव दादा वाघमारे, सोशल मीडिया प्रमुख मनोज सोनकांबळे,जिल्हा उपाध्यक्ष मा. मंगेशजी भुरे, मुखेड अध्यक्ष राज लष्करे, मुखेड शहराध्यक्ष कपिल गायकवाड, नांदेड शहर सचिव ऋषिकेश भद्रे व इतर भीमसैनिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.