logo

महाभयंकर! ड्रग्स डोक्यात भिणलं, पैशांसाठी वेगवेगळ्या पुरुषांशी शरीरसंबंध; तरुणीमुळे १९ जणांना एड्स

१७ वर्षांच्या एका मुलीमुळे १९ तरुणांना एचआयव्ही झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्रग्जचं व्यसन लागलेल्या या मुलीने पैशांसाठी तरुणांसोबत शरीरसंबंध ठेवंले आणि यातून एचआयव्ही पसरत गेला.
उत्तराखंडच्या रामनगर शहरामध्ये भयंकर घटना घडली. ड्रग्जचे व्यसन असलेल्या १७ वर्षीय मुलीने पैशांसाठी वेगवेगळ्या पुरूषांशी शरीरसंबंध ठेवले. या मुलीमुळे १९ जणांना एचआयव्हीची लागण झाली. या तरुणांना हे माहिती नव्हते की ते ज्या मुलीसोबत शरीरसंबंध ठेवत आहेत ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. यापैकीच एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली आहे
एका तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दावा केला आहे की मुलीच्या संपर्कात आलेल्या पुरूषांना ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे हे माहित नव्हते. ज्या तरुणांनी या मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले होते त्यापैकी काही जण विवाहित आहेत. ज्यामुळे हा विषाणू त्यांच्या पत्नींमध्ये पसरला.
तरुणाने या पोस्टमध्ये असे देखील सांगितले की, 'उत्तराखंडमधील नैनितालमधील एका १७ वर्षीय मुलीने १९ तरुणांना एचआयव्ही दिला. तिला ड्रग्जचे व्यसन होते आणि तिचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या अनेक तरुणांसोबत शारीरिक संबंध ठेवले. या पुरूषांना माहित नव्हते की तिला एचआयव्ही आहे. तिचे काही विवाहित पुरूषांसोबतही संबंध होते. ज्यांच्या पत्नींनाही एचआयव्ही झाला आहे."
तरुणाने या पोस्टमध्ये असे देखील सांगितले की, 'उत्तराखंडमधील नैनितालमधील एका १७ वर्षीय मुलीने १९ तरुणांना एचआयव्ही दिला. तिला ड्रग्जचे व्यसन होते आणि तिचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या अनेक तरुणांसोबत शारीरिक संबंध ठेवले. या पुरूषांना माहित नव्हते की तिला एचआयव्ही आहे. तिचे काही विवाहित पुरूषांसोबतही संबंध होते. ज्यांच्या पत्नींनाही एचआयव्ही झाला आहे."मुलीने ज्या तरुणांसोबत शरीरसंबंध ठेवले होते त्या तरुणांनी काही गंभीर आरोग्य समस्यांची तक्रार केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्यांनी राम दत्त जोशी जॉइंट हॉस्पिटलमधील ICTC शी संपर्क साधला. ज्याठिकाणी त्यांची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली आणि ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. या तरुणांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी या मुलीसोबत संबंध ठेवल्याचे समोर आले
आर्थिकदृष्ट्या कुटुंबाची बिकट परिस्थिती असल्यामुळे ही मुलगी ड्रग्ज घेत होती. समुपदेशनादरम्यान असे आढळून आले की ती अनेक महिन्यांपासून अनेक संक्रमित पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवत होती. त्यामुळे या मुलीला एचआयव्ही झाला आणि तो पसरत गेला. या मुलीमुळे १९ तरुणांना एचआयव्ही झाला आणि आता त्यांच्या बायकोलाा देखील एचआयव्ही झाला. या घटनेमुळे आता खळबळ उडाली असून हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

150
1067 views