logo

अतुलनीय कार्याची दखल India Book of Records आणि Asia Book of Records मध्ये घेण्यात आली आहे

तमिळनाडूच्या तिरुची (तिरुचिरापल्ली) शहरात एका शांत घरात, ३३ वर्षीय गृहिणी सेल्वा बृंदा यांनी एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे असंख्य नवजात बाळांना नवं जीवन मिळालं.

एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत त्यांनी ३०० लिटरहून अधिक दूधदान केलं. हे दूध महात्मा गांधी मेमोरियल गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या दूध बँकेला दिलं गेलं. विशेष म्हणजे, या बँकेच्या एकूण संकलनाच्या जवळपास अर्धा वाटा फक्त सेल्वा यांचाच होता !

ही प्रत्येक बाटली गेली ती अशा अर्भकांसाठी जी वेळेपूर्वी जन्मलेली होती, ज्यांचं शरीर इतकं नाजूक होतं की आईच्या कुशीतसुद्धा ठेवता येत नव्हतं. पण त्या बाळांना एक संधी मिळाली जगण्यासाठी, आणि ती संधी दिली सेल्वा यांनी.

त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल India Book of Records आणि Asia Book of Records मध्ये घेण्यात आली आहे. आणि आज, World Breastfeeding Week निमित्त, रुग्णालय त्यांचा सत्कार करत आहे -एका आईचा, एका वीरमातेसारखा.

आई होणं ही निसर्गाची देणगी असते, पण दुसऱ्यांच्या बाळासाठी आईसारखं वागणं - ही माणुसकीची सर्वोच्च पातळी असते. सेल्वा बृंदा यांनी केवळ दोन मुलांची आई म्हणून नव्हे, तर हजारोंच्या जीवनात उजेड आणणारी 'आधारमाऊली' म्हणून स्वतःचं आयुष्य वेचलं.

ती दोन मुलांची आई आहे, पण अनेकांची हिरो आहे.

अशा मातांना सलाम, ज्या केवळ जन्म देत नाहीत, तर पुन्हा पुन्हा जीवन देतात.

122
1383 views