logo

आज 9आगस्ट विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त अक्कलकुवा येथील महाकाली माता मंदिराच्या सभा मंडपात दोन दिवसीय विविध कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.


अक्कलकुवा प्रतिनिधी (गंगाराम वसावे)
आज 9आगस्ट विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त अक्कलकुवा येथील महाकाली माता मंदिराच्या सभा मंडपात दोन दिवसीय विविध कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.
सदर कार्यक्रम हे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. अक्कलकुवा तालुक्यात आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सन २००३ पासून आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात येतो. सकाळी अक्कलकुवा येथील विर एकलव्यच्या पुतळ्याचे विधिवत पारंपारिक पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महाकाली माता मंदिराच्या सभा मंडपात आदिवासी बांधवांचे कुलदैवत याहामोगी मातेचे पारंपारिक पद्धतीने अन्नधान्यचे पुजन करण्यात आले. त्यानंतर सभा संपन्न झाली. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित जनसागराला मार्गदर्शन केले. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी आदिवासी बांधव हा निसर्ग पुजक असुन आपण जल, जमीन, जंगलचे संवर्धन केले पाहिजे असे सांगत आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आदिवासी विश्व दिनानिमित्त आदिवासी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन त्यांना आपल्यातील कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करुन देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. याप्रसंगी जी. डी. पाडवी, वसंत वसावे, पृथ्वीसिंग पाडवी, माजी समाज कल्याण माजी शंकर पाडवी,
अँड. एल. एम. पाडवी, कान्हा नाईक, किसन महाराज, कथ्थु सैंदाणे, रविंद्र पाडवी, विश्वास मराठे, रविंद्र चौधरी, कपिलदेव चौधरी, डिम्पल चौधरी, विनोद वळवी, राजेंद्र वसावे, जेका पाडवी, तुकाराम वळवी, आनंद वसावे, जवराबाई पाडवी, दुर्गाताई पाडवी, कांचन पाडवी, ललिता वळवी, अंजुताई पाडवी, सुनिता पाडवी, निता माळी, संध्या पाटील, भावेश पाडवी, तसेच आदिवासी कलाकार व शालेय विद्यार्थी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेनंतर अक्कलकुवा शहरातून पारंपारिक ढोलवाद्य, तुरवाद्य, पावा, बासरीच्या ठेक्यावर सवाद्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी बांधवआप आपली पेहराव करुन मोठ्या जल्लोषात सामील झाले. रॅलीत
सोंगाड्या पथकाने आपली संस्कृती जीवंत ठेवली.



126
2274 views