"माजी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचा सेवापूर्ती सन्मान"
फोटो कँप्शनअमळनेर येथे माजी पोलिस निरीक्षक विकास देवरेसाहेब यांचा मराठी लाईव्ह न्युजतर्फे सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. सन्मानपत्र व पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, पत्रकार ईश्वर महाजन, समाधान मैराळे, नुरखान आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या कार्याचा गौरव झाल्याबद्दल देवरे यांनी मराठी लाईव्ह न्युजचे मनःपूर्वक आभार मानत, “माझ्या सेवेला दिलेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे,” असे भावनिक शब्दांत व्यक्त केले.