logo

बीडमध्ये एसटी व कारची जोरदार धडक; दोघे जखमी.


बीड जिल्ह्यातील तेलगाव–धारूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरंबा गावाजवळ काल संध्याकाळी एसटी बस आणि कार यांचा भीषण अपघात झाला. पंढरपूरहून माजलगावकडे जाणाऱ्या कारला, माजलगाव–कोल्हापूर मार्गावरील एसटी बसने अरुंद पुलावर जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील दोघे प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

2
954 views