logo

धरणगावात लक्ष्मीकांत डेडिया स्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न : व्हायोलिन - बासरी वादनाने श्रोते भारावले : गीत गायनाने आणली रंगत :

धरणगावात लक्ष्मीकांत डेडिया स्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न :

व्हायोलिन - बासरी वादनाने श्रोते भारावले : गीत गायनाने आणली रंगत :


अमळनेर प्रतिनिधी

येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व संगीताचार्य स्व. लक्ष्मिकांत डेडिया शिष्यपरिवार यांच्यावतीने आयोजित स्वरांजली कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. संगीत महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून राहुल जैन यांनी स्वरांजली कार्यक्रमाची संकल्पना सांगून भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. उद्घाटक प्रा.वा.ना.आंधळे यांनी समाजाच्या मानसिक शांतिसाठी आणि जगणे आनंदी करण्यासाठी संगित किती महत्वाचे आहे ते उदाहरणांसह पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अजित डहाळे यांनी कार्यक्रमात सहभागी कलावंतांना सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. या सांगितिक उपक्रमाने गावाला एक नवी ओळख निर्माण करुन दिल्याबद्दल त्यांनी मंडळाचे अभिनंदन केले. या प्रसंगी कांतिलाल डेडिया, डॉ. मिलिंद डहाळे, गणेश रावतोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व भगवान महावीर आणि स्व. लक्ष्मिचंद डेडियांच्या प्रतीमांचे पूजन करण्यात आले. व्हायोलिन वादक भूषण चौधरी (हरिद्वार) आणि बासरी वादक योगेश पाटील (एरंडोल) यांच्या सोलो आणि समुह वादनाने कार्यक्रमाची बहारदार सुरवात झाली. त्यानंतर सचिन कासार (शोधसी मानवा), सौ. स्वाती भावे (कौसलेचा राम), देवा महाजन (पाऊले चालती), सुधीर भावसार (राजस्थानी भजन), संजय परदेशी (यशोमती मैय्या से), कु. उत्कर्षा भरत चौधरी (फुलले रे क्षण माझे), राजेश डहाळे (कुहू कुहू बोले कोयलीया), तनय डहाळे ( झनक झनक तोही बाजे), नाना पवार (मैली चादर ओढके कैसे), अहान तनय डहाळे (कानडा राजा पंढरीचा), नाना पवार (मैली चादर ओढके कैसे), कु. श्रेया भावे (अवघे गरजे पंढरपूर), प्रा.बी.एन.चौधरी (जीवनाच्या संध्याकाळी) आणि प्रदिप झुंजारराव (पायलिया झनकार मोरी) यांच्या गीतगायनाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. आर. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक जैन यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट व स्व. लक्ष्मीचंद डेडिया शिष्य परिवार तर्फे राहुल जैन, श्रेयान्स जैन, प्रतीक जैन, निकेत जैन, पियुष डहाळे, प्रदीप झुंझारराव, तनय डहाळे, प्रा. ए आर पाटील, नितीन जैन, सुयश डहाळे, प्रमोद जगताप, नाना पवार, प्रफुल्ल जैन,सुजित जैन,विलास जैन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील जेष्ठ, जाणकार रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय होता.

1
99 views