logo

*जनता विद्यालय देवळी येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा....*

वर्धा जिल्हा प्रतिनिधी:-

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राखी बनविण्याची स्पर्धा आणि रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम जनता स्काऊट-गाईड च्या वतीने राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य धर्मेश झाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नितेश झाडे (जिल्हा संघटक, भारत स्काऊट-गाईड वर्धा), राजहंस जंगले (स्काऊट ट्रेनर), तसेच अभिजित पडगांवकर (स्काऊट मास्टर) यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथींमध्ये शाळेचे उपमुख्याध्यापक सुरेंद्र उमाटे, गाईडर रेखा पट्टे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रिया जाधव यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट-गाईड जनक लॉर्ड बॅडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर राखी बनविण्याची स्पर्धा सुरू झाली. यात एकूण १२७ स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
या प्रसंगी रेखा पट्टे, राजहंस जंगले, सुरेंद्र उमाटे व नितेश झाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून रक्षाबंधनाच्या सणाचे महत्व सांगितले.
स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये माहीन मेहमूद शेख, स्वरा अमोल सुरडकर, स्वरा दिलीप लाडेकर, वेदांत शंकर केवदे, चांद किसना पचारे यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अनुष्का अनिल वैतागे, देवयानी शंकर पुर्जेकार, सानिया शैलेंद्र लोहकरे, समृद्धी अभय वराडे, भावेश गजानन झाडे यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय प्राचार्य धर्मेंद्र झाडे यांनी भाषणातून "रक्षाबंधन सणाच्या पारंपरिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी या सणातून भावंडांमधील प्रेम, विश्वास व संरक्षणाच्या नात्याची जपणूक करण्याचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांनीही परस्परांमध्ये बंधुभाव व ऐक्य टिकवून समाजात सद्भावनेचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले."
कार्यक्रमाचे संचालन मयुरी सालंकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगला अवचाट यांनी मानले.
शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी परस्परांना राख्या बांधून बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिला.

4
19 views