
नाशिक येथे आज जळगांव जिल्हा शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न..
नाशिक येथे आज जळगांव जिल्हा शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक झाल.
नाशिक येथे आज जळगांव जिल्हा शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा.ना.दादाजी भुसे साहेब, राज्याचे उद्योगमंत्री मा.ना.उदयजी सामंत, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब, शिवसेना सचिव संजयजी मोरे, शिवसेना सचिव रामभाऊ, शिवसेना सचिव तथा विभागीय संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, मा.खासदार राहुलजी शेवाळे, आमदार चंद्रकांतजी सोनवणे, आमदार अमोलदादा पाटील, मा.महापौर ललित कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल एक्सप्रेस इन, अंबड पार पडली.
याप्रसंगी जळगांव जिल्ह्यातील शिवसेना व युवासेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
यासमयी प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, अंगीकृत सेल / संलग्न संघटना पदाधिकारी नियुक्ती, जिल्हाप्रमुख ते बूथप्रमुख / गट प्रमुख १००% नेमणुका, इतर संघटनात्मक आढावा यांसह विविध महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.