logo

हेमलकसा येथे जागतिक मूलनिवासी गौरवदिन उत्साहात साजरा.

भामरागड ता.१२- तालुक्यातील हेमलकसा येथे शनिवार ९ ऑगस्ट २०२५ ला जागतिक मूलनिवासी गौरवदिन मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भुमीया व पेरमांचे हस्ते विधीवत आदिवासी देवतांचे पूजन करून सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.तद्नंतर उदबोधनाचे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावगायता रामलू सडमेक हे होते.प्रमुख अतिथी अँड.लालसू नोगोटी,माजी नगराध्यक्ष राजू वडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम झोडे, लोककवी दादारावण कुसराम ,राजश्री लेखामी,गोईताई कोडापे,सपनाताई रामटेके,पवन दुधबावरे, किशोर पुंगाटी,झुरु आत्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अँड.लालसू नोगोटी यांनी हा केवळ आदिवासी गौरवदिन नसून मूलनिवासी गौरवदिन असल्याचे विस्तृतपणे मार्गदर्शन केले.या दिनाची सुरुवात, प्रयत्न व महत्त्वही सांगितले. इतर प्रमुख पाहुण्यांनी यावेळी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. दादारावण कुसराम यांनी स्वरचित कविता यावेळी सादर केली. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू काळंगा यांनी केले. सुत्रसंचलन प्रमोद ओक्सा तर उपस्थितांचे आभार चिन्ना महाका यांनी मानले. बेजूर,झारेगुडा,कुमरगुडा,कारमपल्ली,कियर, भामरागड इत्यादी गावांतील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

0
645 views