logo

"सर्पमित्रांसाठी झटणाऱ्या हातांना सलाम – समाजासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या राहुल गट्टे यांचा सन्मान"

आज दिनांक 10 /8/2025 रोजी आमचे मित्र व सहकारी सर्पमित्र राहुल गट्टे यांनी कोब्रा नाग गजानन नगर भागातून रिसीव केला नागाला जीवनदान देण्यासाठी व त्याला बुलढाणा फॉरेस्ट ऑफिसर यांच्या समवेत मुक्त करण्यासाठी बुलढाणा येथे घेऊन जाताना माझी राहुल गट्टे याची भेट झाली थोड्या वेळ चर्चा झाल्यावर मला कौतुककाणे त्यांनी साप असलेली भरणी माझ्या हाती दिली तो नाग चपळ आणि अस्सल नाग होता एवढा विषारी साप पकडताना मी त्याला विनंती केली की आपली सुरक्षा सर्वप्रथम पाहण्याची गरज आहे कारण ही समाजसेवा सर्व सर्पमित्र करीत आहे परंतु बऱ्याच घटना त्यांच्यासोबतही होतात काहींना आपला जीवही गमवावा लागतो अशा घातक गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते परंतु सापाप्रती असलेल्या त्यांचं प्रेम व लोकांना इजा होऊ नये किंवा त्यांचा कोणताही नुकसान होऊ नये यासाठी वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचे काम ते अविरत करत आहे परंतु एक खंत आहे की फॉरेस्ट अधिकारी साप पकडल्यानंतर सर्पमित्रांना साप इथून बुलढाणा पर्यंत घेऊन जावा लागतो त्यासाठी लागणारा खर्च हा त्यांना स्वतःच करावा लागतो त्यांनी मला विनंती केली की सर्व सर्पमित्रांनी पकडलेले साप हे चिखली मधून फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी घेऊन जावे यासाठी तुम्ही यामध्ये आम्हाला मदत करावी अशी विनंती त्यांनी माझ्याजवळ केली. मी त्यांना एका सेकंदामध्ये हा प्रश्न तुमचा मी मार्गी लावतो अशी आश्वासन त्यांना दिले व उद्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी मी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावेल तसेच आपणही सर्पमित्रांचे आभार आपण मानले पाहिजे कारण ते आपला जीव धोक्यात घालून आपल्या सुरक्षिततेसाठी नेहमी तत्पर असतात आपण त्यांना फोन केल्याबरोबर ते स्वतः लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचतात व त्या सापाला जीवनदान देण्यासाठी आपली सर्वांची समाजाची मदत करतात मी सर्व सर्पमित्रांचे आपल्या सर्वांचे वतीने व माझ्या देव्हडे परिवाराच्या वतीने तसेच आधार संघटना व सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवाराच्यावतीन त्यांचे सर्वांचे आभार मानतो व त्यांच्या हातून अशी समाजसेवा होत राहो व त्यांची सुरक्षा परमेश्वर घेत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
आपलाच
सुभाष बबनराव देव्हडे
अध्यक्ष आधार संघटना व सेना
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल बुलढाणा जिल्हा

2
392 views