logo

चिखली तालुक्यात ढगफुटीमुळे भीषण नुकसान – शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुभाष देव्हडे मैदानात"

आज दिनांक 11/8/2025 रोजी चिखली तालुक्यात ढगफुटी झालेले गावे भोरसा भोरसी ,खैरव, पांढरदेव, वरखेड, सावंगी गवळी , वरखेड, घाणमोडी मानमोडी अंबाशी या गावांमध्ये ढगफुटी झाल्यामुळे गावातील शेतीचे तसेच रस्ते पूल यांचे बरेच नुकसान झाले आहे शेतामध्ये पिके पाण्याखाली आले आहे तसेच गुरांचे गोठे यांचेही नुकसान झाले आहे त्यामुळे मी आज सुभाष बबनराव देव्हडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल भोरसा भोरसी या गावांमध्ये शेतकऱ्यांची भेट व झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आज त्यांच्यापर्यंत पोहोचलो भोरसा भोरसी या गावांमध्ये शेतीचे व पुलाचे झालेले नुकसान पाहिल्यानंतर झालेल्या अतिवृष्टी चे गांभीर्य दिसून येते तेथे पुरामध्ये वाहून जाताना ग्रामस्थांनी चार ते पाच जणांचा जीव वाचवला आहे त्या सर्वांना मी सर्वांचे वतीने आभार मानले आपला जीव धोक्यात घालून त्यांनी आपल्या गावातील लोकांचे जीव वाचवले ही फार मोठी गोष्ट आहे झालेले नुकसान हे भरून निघू शकते पण गेलेला जीव हा परत येऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे कौतुक करणे क्रमांक प्राप्त आहे ग्रामस्थांकडून मी त्या दिवशी झालेली अतिवृष्टीची सर्व माहिती घेतली त्यानंतर नायब तहसीलदार वीर साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यांनी कालच तालुक्याच्या लाडक्या आमदार श्वेता ताईंसोबत काल येऊन गेलो असे सांगितले मी त्यांना सांगितले मी ताईंशी याविषयी चर्चा करेल आपणाला विनंती करतो की पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सढळ हाताने मदत करावी कारण शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले असून शासन त्यांच्या पाठीशी उभे राहिल अशी ग्वाही दिली यावेळी माझ्यासोबत समाधान भाऊ खवसे, अशोक भाऊ सोळंके, जमील भाई, तसेच मोठ्या संख्येत ग्रामस्थ हजर होते

0
318 views