logo

भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका आयोजित भव्य निबंध स्पर्धा

भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका"भव्य निबंध स्पर्धा"आयोजित करण्यात आली आहे.

सर्व देशभक्त बंधू आणि भगिनींना सस्नेह नमस्कार
ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर यावेळी च्या स्वातंत्र्य दिनाला अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त झालेले असून, आपल्या सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी, तसेच देशवासियांमध्ये देशभक्ती जागविण्यासाठी, तिरंग्यास नमन करण्यासाठी मोदीजींच्या आव्हानाने हर घर तिरंगा घरघर तिरंगा अभियान पूर्ण देशभर मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. आपणास विनंती की आपण आपापल्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यात यावा. तसेच गावागावातून निघणाऱ्या तिरंगा सन्मान यात्रेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील देश भावना रुजावी म्हणून भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्यातर्फे भव्य निबंध स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्पर्धेची माहिती पुढील प्रमाणे

*पहिला गट* 5वी. ते. 7वी
1) तिरंगा आणि मी
2) पाकिस्तान एक वेदना

*दुसरा गट*. 8वी ते 10वी
1) आपण जिंकलो ऑपरेशन सिंदुर
2)फाळणी एक असह्य वेदना
3) तिरंगा आमचा स्वाभिमान

*11वी पासून पुढे तिसरा गट*
1) भारताची यशस्वी कामगिरी ऑपरेशन सिंदूर
2)14 ऑगस्ट अखंड भारत दिन
3) आपला स्वाभिमान हर घर तिरंगा

*विनीत*
*गोविंद चंद्रकांत शेलार*
*तालुका अध्यक्ष*
भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका

0
66 views