logo

"रफीक शेख यांची सातारा जिल्हा अध्यक्षपदी फेरनियुक्ती – पदग्रहण सोहळ्यात लढाऊ निर्धार"

पुणे : आज पुणे येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. मनोजदादा आखरे यांच्या अध्यक्षतेखाली, महासचिव मा. सौरभदादा खेडेकर, मुख्य प्रवक्ते मा. गंगाधर बनबरे सर तसेच राज्य कार्यकारिणीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्य व जिल्हा पदाधिकारी पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात संभाजी ब्रिगेडच्या सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, विभागीय व राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी रफीक शेख यांची सातारा जिल्हा अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली असून, कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
नव्या जबाबदाऱ्यांसह पुढील वाटचालीसाठी लढाऊ निर्धार व्यक्त करण्यात आला.

27
963 views