logo

चहा विक्रेत्याने २० ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट केले परत


अमळनेर येथील 'योगेश'चा प्रामाणिकपणा


अमळनेर : तुटपुंज्या कमाईवर घरसंसार चालवणाऱ्या योगेश पाटील या चहा विक्रेत्याने दुकानात आलेल्या ग्राहकाचे तब्बल २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला परत केले. यातून समाजासमोर प्रामाणिकपणाचा एक आदर्श निर्माण केला आहे.

तहसील कार्यालयासमोर योगेश पाटील या तरुणाचे चहाचे दुकान आहे. पारोळा येथील विलास आत्माराम पाटील आणि पिंगळवाडे येथील संदीप दगा पाटील हे दोघे ९ तारखेला येथे खासगी कामासाठी आले होते. ते सकाळी सुमारे ११ वाजता चहा पिण्यासाठी गेले. चहा पिऊन झाल्यानंतर ते दोघे तेथून निघून

गेले. मात्र, बाहेर पडताना विलास पाटील यांच्या हातातील २० ग्रॅम वजनाचे (अंदाजे किंमत सुमारे २ लाख रुपये) सोन्याचे ब्रेसलेट नकळत दुकानांच्या पायऱ्यांवर पडले. काही वेळानंतर योगेश पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी ते ब्रेसलेट सांभाळून ठेवले.

एक ते अडीच तासानंतर ब्रेसलेट हरविल्याचे लक्षात आल्यावर विलास पाटील यांनी शहरात ज्या ज्या ठिकाणी भेट दिल्या होत्या, त्या सर्व ठिकाणी जाऊन ब्रेसलेटबद्दल विचारणा केली. शेवटी ते या चहा दुकानावर आले. त्यांनी ब्रेसलेटबाबत विचारणा केली असता, योगेश पाटील यांनी शहानिशा करून ब्रेसलेट त्यांना परत केले. घरची परिस्थिती साधारण असूनही योगेश पाटील यांनी सुमारे दोन लाख किमतीची सोन्याची वस्तू परत करून दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

2
116 views