
Aima media jan jan ki avaj
Date:14/08/2025 time 9:20am
Raigad News : पोहण्याचा मोह अंगलट आला, बीडच्या अभयचा रायगडमध्य
Aima media jan jan ki avaj
Date:14/08/2025 time 9:20am
Raigad News : पोहण्याचा मोह अंगलट आला, बीडच्या अभयचा रायगडमध्ये बुडून मृत्यू झाला; जीन्स अन् टी-शर्टने घात केला
Beed Boy Drowns in Raigad : रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धरणाच्या पाण्यात बुडून बीडच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जीन्स आणि टी-शर्टमुळे अभयचा घात झाला. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत धरणात आणि समुद्रात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडत आहेत. मात्र अशीच एक धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील कलोते येथे घडली आहे. धरणाच्या पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाली असल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत पावलेल्या तरुणाचं नाव अभय शिवाजी राऊत (वय २३, रा. माजलगाव, जि. बीड) असं असून तो एका रिसॉर्टमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या कलोते ग्रामपंचायत हद्दीतील कॅप मॅक्सजवळ असलेल्या 'लाईफ अँड जॉय' या रिसॉर्टमधील कामगाराचा कलोते धरणात बुडून मृत्यू झाला. अभय शिवाजी राऊत (वय २३, रा. माजलगाव, जि. बीड) असं मृत तरुणाचं नाव आहे.