
नाशिक मालेगांव पाटबंधारे विभागातील भ्रष्ट व गैरव्यवहार करणाऱ्या अधिकार्यांची चौकशी करावी.
नाशिक रोड प्रतिनिधी दिनांक 12 /8 /2025 नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ आर.टी.आय कार्यकर्ते दीपक सखाराम शेजवळ यांनी मालेगाव पाटबंधारे विभागातील कामात भ्रष्ट व गैरव्यवहार झाल्याचा संशय आला म्हणून जन माहीती अधिकारी २००५ कायदयान्वये रा. शा. निकम जन माहीती अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्याकडे सदरच्या कामाची माहितीअर्जाद्वारे मागितली परंतु अर्जाला केराच्या टोपली टाकून आमच्या कडे माहीती नसुन देऊ शकत नाही असे उत्तर दिले सदरची माहिती मिळालीच पाहिजे यासाठी अर्जदार शेजवळ यांनी प्रथम अपिल अधिकारी यांच्याकडे अपील करून त्या अर्जाची सुनावणी होऊन अर्जदार यांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दयावी असा आदेश पारित केला परंतु सदरच्या विभागांनी प्रथम अपील अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे. तसचे माहिती देण्यास टाळा करताना दिसत असून याचाच अर्थ मालेगाव पाटबंधारे विभागात भ्रष्टाचार व गैर व्यवहार झाल्याची दाट संशयाची सुई त्यांच्याकडे झुकते माप देत आहे ्या्मुळे संबंधित विभागातील शासन स्तरावरील उच्च अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष रीतीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई जोपर्यंत होणार नाही तो पर्यंत विभागीय आयुक्तां समोर बेमुदत उपोषणास स्थगित होणार नाही असा इशारा दीपक शेजवळ व त्यांच्या सहकार्यांनी दिलेला आहे
वृत्त संकलन नाशिक महा. शशिकांत दा. भालेराव.