logo

वासांबे ग्रुप ग्रामपंचायती मधील हद्दीत सर्व नागरिकांची अँटिजेन टेस्ट करावी



.

सामर्थ्य जनशक्ती संघटने तर्फे ग्रुप ग्रामपंचायत वासांबे हद्दीतील कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता. ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच नागरिकांची अँटिजेन चाचणी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

वासांबे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लक्षणे नसलेली कोरोना रुग्ण वाढत आहेत . आणि अनेक नागरिकांना वेळीच उपचार होत नसल्याने त्यांची प्रकृती गंभीर तसेच अनेक लोकाना आपला जीव गमवावा लागला आहे . आणि यावर उपाय म्हणून  अँटिजेन चाचणी करून पोजिटिव्ह रुग्णांना वेळीच उपचार व्हावे  . असा मागणी चा पत्र ग्रुप ग्रामपंचायत वासांबे चे ग्रामविकास अधिकारी यांना दिलेले आहे . व त्याची प्रत मा.तहसीलदार खालापूर तथा कोविड आधिकारी  इरेश चप्पलवार, आरोग्य अधिकारी डॉ.रोकडे, व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांना पाठवलेली आहे.

68
14767 views
  
79 shares