logo

भक्ती, उत्साह आणि कला यांचा संगम! स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचे अमळनेरात भव्य उद्घाटन

भक्ती, उत्साह आणि कला यांचा संगम! स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचे अमळनेरात भव्य उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचा भव्य उदघाटन सोहळा उपविभागीय अधिकारी श्री नितीन जी मुंडावरे यांच्या हस्ते संपन्न झाला. उद्घाटन प्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे पूजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
या प्रसंगी डी.वाय.एस.पी. श्री कोते साहेब, पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम साहेब, रेल्वे विभागाचे मुख्य प्रबंधक श्री सत्यजित कुमार साहेब, चव्हाण साहेब, समाजसेवक श्री मनोहरजी निकम, उद्योजक श्री प्रशांत भाऊ निकम, गणेश भोई, प्रकाश भोई, कैलास भोई, घनश्याम महाजन, दुर्गेश बडगुजर तसेच अनेक गणेशभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार स्टॉलचे मालक कैलास भोई यांनी केला. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी स्टॉलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अमळनेर शहरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून, विविध गणेशमंडळे व घराघरांत गणरायाचे स्वागत करण्याची लगबग सुरू झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या पर्वाची आतुरता असून, आकर्षक मूर्ती मिळवण्यासाठी नागरिकांची पसंतीचे ठिकाण ठरत आहे श्री स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉल.
गणेश भोई यांनी सांगितले की, “येथे ६ इंचांपासून ते तब्बल ८ फूट उंचीपर्यंतच्या गणपती मूर्ती उपलब्ध आहेत. किंमत फक्त १०१ रुपये पासून सुरू होऊन १२,००० रुपये पर्यंत आहे. दर्जेदार व देखण्या मूर्तींचा संग्रह गणेशभक्तांना येथे मिळेल.” तसेच त्यांनी सांगितले की, “स्वामी समर्थ गणेश स्टॉलमध्ये आतापासूनच गणरायाच्या मूर्तीची मंडळांची बुकिंग सुरू झाली आहे. आपण आमच्या स्टॉलला भेट द्यावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत असल्याने अमळनेर नगरीत भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण रंगत आहे.



0
0 views