logo

संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे! साताऱ्यातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू

सातारा -
साताऱ्यात गणेशोत्सवाआधी खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अपघातांची मालिका आणि रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या सातारकरांचा संताप वाढत होता. याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला जोरदार इशारा दिला. 'तीन दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करा, नाहीतर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने आंदोलन करेल,' असा थेट आणि कडक इशारा बांधकाम विभाग आणि सातारा नगरपालिकेला देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचा हा इशारा साधा नव्हता, तो प्रशासनासाठी एक हादरा होता! या इशाऱ्यानंतर प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली. यामुळे सातारा शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.
या दणकेबाज इशाऱ्यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख रफीक शेख, शहर प्रमुख अमोल नलावडे यांच्यासह महेश गराटे, इम्रान कच्ची, नाजीम बागवान, संकेत भोईटे, ओंकार पाटोळे, अक्षय धायगुडे, चंद्रकांत खरात, प्रतील सोनवलकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या या आक्रमक भूमिकेमुळेच रस्ते दुरुस्तीचे काम मार्गी लागले, अशी भावना व्यक्त करत नागरिक आणि संघटनेने प्रशासनाचे आभार मानले आहेत. संभाजी ब्रिगेडने दाखवून दिले की, योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यास प्रशासनाला झुकवता येते!

6
1103 views