
सावनेर येथे भव्य तिरंगा बाईक रॅली
नागपूर जिल्हा:
प्रतिनिधी चंदू मडावी :
मिळालेल्या माहितीनुसार
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशाचा प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्याकरिता देशभक्तीचा उत्सव साजरा करण्याकरिता सावनेर गांधी चौक येथून भव्य तिरंगा बाईक रॅली सुरुवात झाली.
गडकरी चौक, बाजार चौक झेंडा चौक, पहलेपार, होळी चौक, तहसील कार्यालय परंत सर्व लोकांनी देशभक्तीचे नारे देत तिरंगा बाईक रॅलीतुन देशभक्तीचे दर्शन घडवून दिले.पाऊस असताना सुद्धा अधिकारी वर्ग जनतेनी प्रचंड सहभाग नोंदवला.
प्रसंगी श्री मनोहर कुंभारे, श्री राजीव पोतदार, श्री अशोक धोटे, श्री अरविंद लोधी, श्री पियुष बुरडे, श्री संपत खलाटे (उपविभागीय अधिकारी), श्री अक्षय पोयम (तहसीलदार), श्री महेश चकोले, श्री पवन जामदार, श्री मंदार मंगळे, श्री दिगंबर सुरतकर, श्री आयुष लोधी, श्री राजू घुगल, श्री तुषार उमाठे,श्रीमती वैशाली कोहळे, श्री विलास ठाकरे, श्री पांडुरंग भोंगाडे, श्रीमती रेखाताई पोटभटरे, श्री पंकज भोंगाडे, श्री सुरेंद्र शेंडे, श्री पिंटू सातपुते, श्री विलास महल्ले, श्री आशिष माटे, श्रीमती ज्योतीताई कांबळे, श्री मधु दरवाई, श्रीमती मीना खापर्डे, व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.