logo

अशोक पवार यांनी क्युरीओसिटी स्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून केला आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा

सांगवी नांदेड येथील क्युरिओसिटी स्कूलचा विद्यार्थी रूद्र पवार याचा वाढदिवस शालेय साहित्य व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व प्रथम प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस क्युरिओसिटी स्कूलच्या वतीने त्यास बर्थडे कार्ड व छोटीशी गिफ्ट शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी देऊन रूद्र पवार यास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यांत आल्या त्यानंतर रुद्र पवारांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे संचालक प्रा.माधव खिल्लारे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन शिक्षण प्रेमी पालक अशोक पवार यांचे आभार मानले व तुमच्या या शालेय साहित्यामधून आमच्या चिमुकल्याना निश्चित त्यांच्या शैक्षणिक बाबींसाठी मदत होईल अशी आशा व्यक्त केली.

0
3 views