logo

रामटेक मध्ये आमदार डॉ. आशिष राव देशमुख यांच्या हस्ते अरविंद सहकारी बँकेच्या एटीएम चे भव्य उद्घाटन

नागपूर जिल्हा:
प्रतिनिधी चंदू मडावी :

मिळालेल्या माहितीनुसार
रामटेक, १३ ऑगस्ट २०२५ – रामटेक तालुक्यातील नागरिकांसाठी आधुनिक आणि जलद बँकिंग सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अरविंद सहकारी बँक शाखेत नवे एटीएम सुरू करण्यात आले. या एटीएमचे लोकार्पण आज आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस बँकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर आमदार डॉ. देशमुख यांनी एटीएमचे लोकार्पण करताना सांगितले की, “डिजिटल व्यवहारांच्या युगात ग्रामीण भागातही आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे. या नव्या एटीएमच्या माध्यमातून नागरिकांना रोख रक्कम काढणे, शिल्लक तपासणे, तसेच इतर विविध सेवा सुलभ आणि जलद मिळतील.”

तसेच, आमदार डॉ. देशमुख यांनी विशेष नमूद केले की अरविंद सहकारी बँक ही बँक शनिवारी व रविवारी देखील ग्राहकांसाठी खुली असते आणि येथे कोणत्याही प्रकारचा लंच टाईम नसतो. बँकेचे कामकाज सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत अखंड सुरु राहते, ज्यामुळे ग्राहकांना वेळेची मर्यादा न बाळगता सेवा घेता येते.

या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मल्लिकार्जुनजी रेड्डी, विवेक तोतडे, सुधाकर मोहोड, दीपक मोहोड, रजत गजबे, कमलाकर हिंगे, संजय मुलमुले, सुनील मुलमुले, सतीश तिवारी, सुनंदा लेंडे, वनमाला चौरागडे, रामचंद्र दमाहे यांनी उपस्थिती दर्शवली. बँकेचे उपाध्यक्ष विजयजी धोटे, संचालक मंडळ सदस्य एकनाथजी चौधरी, सीईओ राजा राव (पी.आर. सर), जनरल मॅनेजर राजेंद्रजी चव्हाण, मॅनेजर सुमन दुबे आणि सर्व बँक कर्मचारी या सोहळ्यात सहभागी झाले.

उद्घाटनानंतर स्थानिक नागरिकांनी एटीएमची पाहणी केली आणि या सुविधेमुळे बँकेच्या कामकाजात गती येईल तसेच वेळेची बचत होईल, असे समाधान व्यक्त केले. रामटेकमधील मान्यवर नागरिक आणि ग्राहकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

121
3445 views