logo

जनता शाळेत शालेय गणवेश वितरण सोहळा उत्साहात


पिंपळगाव सराई, ता. चिखली – जनता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा पिंपळगाव सराई येथे दिनांक १२ जुलै २०२५ रोजी शालेय गणवेश वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते.

मंचावर सौ. निर्मला देवराव खुर्दे (मुख्याध्यापिका, जनता मराठी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव सराई), सदाशिव शिंदे (सल्लागार, समिती सदस्य), रामकृष्ण शामराव जाधव, संजय पिवटे (पर्यवेक्षक), अविनाश असोलकर, शिवहरी मिसाळ, सुदाम चंद्रे यांची उपस्थिती लाभली.

गणवेश मोफत उपलब्ध करून देण्याचे उदात्त कार्य खालील मान्यवरांनी केले – डॉ. संध्याताई कोठारी (अध्यक्षा, दि अंबिका अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, चिखली), मदनराव पुंडलिक गवते (अध्यक्ष, पिंपळगाव सराई ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था), अजयकुमार गोपालदासजी कोठारी (अध्यक्ष, धनश्री नागरी सह. पतसंस्था, चिखली), विलासजी भडाईत (अध्यक्ष, आदर्श अर्बन सह. पतसंस्था, चिखली), सौ. ज्योतीताई भाला (अध्यक्षा, रेणुकामाता सह. पतसंस्था, चिखली), रामकृष्ण शामराव जाधव (माजी प्राध्यापक, जनता कनिष्ठ कला महाविद्यालय, पिंपळगाव सराई), रश्मीताई काबरा, हितेशजी गुरुदासानी आणि गोविंदकाका गिनोने.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पाटोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. निर्मला खुर्दे यांनी मान्यवरांचे आभार मानून केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष रामकृष्णदादा गोविंदराव शेटे, सचिव प्रेमराज प्रभुलालजी भाला, संचालक मंडळ, सल्लागार समिती सदस्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

6
78 views