logo

७५० जन्मोत्सव निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज जयंती महोत्सव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित

बातम( रवि कदम)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जयंती महोत्सव – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत अकरा किलोचा सुवर्णकलश अर्पण

आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, ग्रामस्थ व अखिल वारकरी गुरुकुल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच विविध संघटनांच्या सहकार्याने संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जयंती महोत्सव भव्य दिमाखात साजरा होणार आहे.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जगातील पहिला अकरा किलोचा सुवर्णकलश ज्ञानोबांच्या मंदिरावर अर्पण केला जाणार असून, या ऐतिहासिक क्षणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत.

१५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता गुरुवर्य मामा साहेब दांडेकर पुतळा (पार्किंग) येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल. पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखात सहभागी होतील. मिरवणुकीत ७५५० टाळकरी, ७५० मृदंग वादक, ७५० झांज वादक, ७५० झेंडेकरी आणि ७५० कलश घेऊन गुरुकुलातील मुली सहभागी होणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व वारकरी बांधव व भगिनींना या दिव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भजन, कीर्तन, वारकरी परंपरेचे दर्शन आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरव अशा सर्व घटकांनी समृद्ध होणार आहे.

51
3566 views
  
1 shares