logo

सावनेरमध्ये आम आदमी पार्टीचा पुन्हा एल्गार — जनतेच्या हक्कासाठी आमरण उपोषण

सावनेर -12 ऑगस्ट 2025 रोजी, आम आदमी पार्टीने जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा हक्काचा आवाज बुलंद केला आहे. या लढ्याचे नेतृत्व आपचे वरिष्ठ नेते संजय टेंभेकर यांनी स्वतः आमरण उपोषणावर बसून केले आहे.
सावनेरच्या जनतेच्या हक्कासाठी उपोषणकर्ता संजय टेंभेकर यांचे हे उपोषण चार ठोस मागण्यांवर केंद्रित आहे :
1. झुडपी जंगल येथे रहिवासी असलेल्या सर्व नागरिकांना तातडीने पट्टे देण्यात यावेत.
2. स्मार्ट मीटर लावू नयेत व लावलेले स्मार्ट मीटर त्वरित काढावेत.
3. भूमी अभिलेख कार्यालयाने वाढलेल्या सावनेरचा सर्वे करून गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढावा.
4. भ्रष्टाचार केलेल्या माजी मुख्याधिकारी (C.O.) किरण बडगे व संबंधित इंजिनियर यांना निलंबित करण्यात यावे.
जनतेचा लढा — तहसील कार्यालयात आपचा ठाम आवाज
या मागण्यांची दखल त्वरित घेण्यात यावी यासाठी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखालील आप कार्यकर्त्यांनी सावनेर तहसील कार्यालय व SDO यांची भेट घेऊन उपोषण तातडीने सोडवण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली.
या उपोषणात आपचे वरिष्ठ नेते संजय टेंभेकर यांना भेटण्यासाठी शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत. त्यांच्या या उपोषणाला आम आदमी पार्टी चे प्रकाश ढोबळे, जामुवंत वारकरी, संजय राऊत, गजु चौधरी, कालिदास बुधोलिया, मोरेश्वर वाघमारे, योगेश राऊत, छत्रपती लांबट, दिनेश मछले, रवी वानखेडे, महेंद्र गोंढाणे, वैशाली जवंजाळ, अनामिका ढिमोले, रुई शेख, अन्सार शेख, कुणाल कोलते, बंडू चौरागडे, प्रमोद तिखे, प्रशांत फलके, रमेश धनोले, वैष्णव ठाकूर, शुभम बन्सोड, शुभम साबळे या सर्वांची साथ मिळत आहे.

2
292 views