logo

**धाराशिवः करजखेड्यात पती-पत्नीची निघृण हत्या – आरोपी पसार**

धाराशिव तालुक्यातील करजखेडा गावात जमीनविवादातून एक संतापजनक घटना घडली आहे. सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

गावातीलच शेतकरी जीवन चव्हाण याने आधी आपल्या वाहनाने पती-पत्नीला चिरडले आणि नंतर कोयत्याने वार करून त्यांचा मृत्यू घडवून आणला.

ही घटना काही वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन वादातून घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

घटनेनंतर आरोपी जीवन चव्हाण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक तपास सुरू आहे.

0
266 views