logo

चारोटी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा – पारंपारिक नृत्यांनी रंगली संस्कृतीची झलक


पालघर जिल्हा पारंपारिक कलाकार फाउंडेशन यांच्या मार्फत चारोटी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष वेशु गुहे यांच्या अथक परिश्रमामुळे हा उत्सव विस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे सदस्य रघुनाथ सुतार, जयेंद्र धांगडा, देऊ गुहे, राजेश मासमारे, शोभना भोईर, अशोक अतकारी तसेच मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आपल्या पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अनेक आदिवासी युट्यूब कलाकारांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, जयेंद्र दुबळा, पांडुरंग बेलकर, विलास वांगड, यतिन नम, योगेश नम, विजय कदम, संतोष लोखंडे तसेच चारोटीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार फाउंडेशनचे अध्यक्ष वेशु गुहे यांनी पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन केला.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कलाकारांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत तारपा नाच, गौरी नाच, टिपरी नाच, ढोल नाच यांसारखे विविध पारंपारिक नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे मनमोहक दर्शन घडवले. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
चारोटीतील हा उत्सव आदिवासी बांधवांच्या एकतेचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरला.

10
681 views