logo

नवऱ्याचा स्पर्म काउंट कमी म्हणून सुनेला गर्भवती करण्यासाठी सासऱ्यासह नणंदेच्या पतीने वारंवार... ती गर्भवती राहिली अन्.......

आज काही भागामध्ये वंशाचा दिवा हवा म्हणून सुनेचा सासरी छळ होतो. पण गुजरात वडोदरामधील धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे. इथे 40 वर्षीय महिलेला मुल होत नव्हतं. त्यामागे कारण म्हणजे नवऱ्याचे स्पर्म काउंट कमी असल्याने तिला गर्भधारा राहत नव्हती. अशात तिच्या सासरच्या लोकांनी केलेले कृत्य अतिशय संतापजनक आहे. (husband had a low sperm count than father in law and relative women rape Crime News in marathi)

काय आहे नेमकी घटना?
महिलेने पोलिसांना सांगितलेल्या तक्रारमध्ये तिला मुल होत नाही म्हणून तिच्या सासऱ्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. एवढंच नाही नणंदेच्या पतीनेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने सांगितलं की, नवऱ्याचे स्पर्म काउंट कमी असल्याने ती गर्भवती राहावी म्हणून सासऱ्यासह नणंदेच्या पतीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर महिला गर्भवती राहिली पण तिचा गर्भपात झाला. त्यानंतर महिलेने नवपुरा पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराबद्दल एफआयआर नोंदवली.

धक्कादायक म्हणजे महिलेने तक्रार सांगितलं की, तिच्या नवऱ्याने खाजगी क्षणांचे फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला आजपर्यंत ब्लॅकमेल केलं. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे लग्न फेब्रुवारी 2024 मध्ये झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळीने तिला तुझ्या वयामुळे तुला गर्भवती राहण्यास अडचणी येतील असं सांगितलं. त्यामुळे ती डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार घे. ती त्याकरिता डॉक्टरांकडे गेली तिथे तिची आणि नवऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या टेस्टमध्ये तिच्या नवऱ्याचे स्पर्म काउंट कमी असल्याच समोर आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं ती गर्भवती होऊ शकत नाही.

डॉक्टरांनी त्या महिलेवर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) केलं पण तेही अयशस्वी झालं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला. पण सासरच्या मंडळीने त्याला नकार दिला.

त्या रात्री झोपली असताना...
महिलेने तक्रारीत सांगितलं की, जुलै 2024 मध्ये, रात्रीच्या वेळी ती खोलीत झोपली असताना अचानक खोलीत सासरे आले. त्यानंतर त्यांनी माझ्या बलात्कार केला, तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. तिने घडलेला प्रकार नवऱ्याला सांगितला पण त्यानेही मुल हवं असेल तर गप्प बस. जर ही घटना कोणाला सांगितलं तर तिचे नग्न फोटो व्हायरल केले अशी धमकी दिली. ती पुढे म्हणाली की, सासऱ्याने वारंवार बलात्कार केल्यानंतरही ती गर्भवती राहिली नाही.

त्यानंतर संतापजनक म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये सासऱ्यानंतर तिच्या नणंदेच्या नवऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केला असा आरोप महिलेने केला आहे. त्या नराधमानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी ती जून महिन्यात गर्भवती राहिली पण जुलैत तिचा गर्भपात झाला. यानंतर मात्र तिने हिम्मत दाखव पोलीस स्टेशन गाठवलं आणि झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगित

1. वडोदरा येथील बलात्कार प्रकरण काय आहे?

गुजरातमधील वडोदरामध्ये एका 40 वर्षीय महिलेने तिच्या सासरे आणि नणंदेच्या पतीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिच्या पतीचे स्पर्म काउंट कमी असल्याने तिला गर्भवती करण्यासाठी हे कृत्य केल्याचा दावा तिने केला आहे. तिने याबाबत नवपुरा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली आहे.

2. या प्रकरणाची सुरुवात कशी झाली?

महिलेचे लग्न फेब्रुवारी 2024 मध्ये झाले. लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या वयामुळे गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात असे सांगितले. वैद्यकीय तपासणीत तिच्या पतीचे स्पर्म काउंट कमी असल्याचे समोर आले, ज्यामुळे ती गर्भवती होऊ शकत नव्हती.

3. महिलेवर कोणत्या प्रकारचे अत्याचार झाले?

महिलेच्या तक्रारीनुसार, जुलै 2024 मध्ये ती झोपलेली असताना तिच्या सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. तिने आरडाओरड केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. डिसेंबर 2024 मध्ये तिच्या नणंदेच्या पतीनेही तिच्यावर बलात्कार केला. दोघांनीही वारंवार लैंगिक अत्याचार केले.

135
6969 views