बोथी गावात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
नवनाथ डिगोळे प्रतिनिधी
बोथी (ता. चाकूर) –
स्वातंत्र्य दिनानिमित्त बोथी गावात विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहाचे वातावरण रंगले. सकाळी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, भाषणे आदींचे मनमोहक सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण मुलींच्या टिपऱ्या नृत्यकलेचे होते. तसेच केशवराव पाटील विद्यालयाच्या वतीने झालेल्या भाषण स्पर्धेत मुलींनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
धार्मिक परंपरेचा सन्मान राखत गावातील भजनी मंडळाने संतांची गाथा अभंगांच्या माध्यमातून सादर केली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात महिला भजनी मंडळींनी डोक्यावर कलश घेऊन दिंडीमध्ये सहभाग घेत, भक्ती व उत्साहाचे सुंदर दर्शन घडवले.
या सर्व उपक्रमांमुळे गावात देशभक्ती, सांस्कृतिक जपणूक व संतपरंपरेचे मूल्य यांचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले.