logo

देवळाली प्रवरात शेत जमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल..

देवळाली प्रवरात शेत जमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल

राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरामध्ये शेतीच्या वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करत विविहीतेचा विनयभंग केल्याची घटना घडल्या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध मारहाण तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३७ वर्षीय विवाहितेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझे पती घरी असताना आमच्या घरासमोर अनिल रावसाहेब देठे यांनी आमच्या घरासमोर येऊन सांगितले की,आपल्याला शेती विषयी बोलायचे आहे. तुम्ही आमच्या घरी चला असे सांगितले आम्ही दोघे त्यांच्या घरी गेलो त्यावेळी कुंदा रावसाहेब देठे ही म्हणाले की, तुम्ही आमच्या नावावर असलेली शेत जमीन तुमची आहे असे का म्हणतात ती शेत जमीन आम्हाला सोडून द्या असे म्हणत शिवीगाळ करत असताना, मी त्यांना म्हणाले की पूर्वीपासून आम्ही सदर शेत जमिनीस शेतजमिनीत राहावयास असून सदरची शेतजमीन ही आमचीच आहे आम्ही जमीन तुमच्या नावावर करून देणार नाही असे म्हटल्याचा राग आल्याने सुभाष रावसाहेब देठे यांनी तुम्ही शेत जमीन कशी काय देणार नाही असं म्हणत मला शिवीगाळ, दमदाटी करत तोंडात चापट मारत खाली पाडले. व अनिल रावसाहेब देठे, रावसाहेब रामचंद्र देठे यांनी लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केले. मयूरी अनिल देठे,सीमा सुभाष देठे कुंदा रावसाहेब देठे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या देखील गाळ झाल्या आहेत. यादरम्यान माझे पती भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली आहे.
पीडितेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सुभाष रावसाहेब देठे, अनिल रावसाहेब देठे, रावसाहेब रामचंद्र देठे, मयुरी अनिल देठे, सीमा सुभाष देठे, कुंदा रावसाहेब देठे, भावड्या खंडागळे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1
403 views