नांदेडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मोठी चोरीची घटना घडली आहे.
जिल्हाभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या गर्दीत चोरट्यांनी पाकिटे आणि पैसे चोरले. त्यातील एक चोरटा चोरी करत असताना लोकांच्या हाती लागला. त्यानंतर त्या चोरट्यास मारहाण करण्यात आली आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे बैठकीत काही काळ गोंधळ उडाला होता.