logo

१० थरांचा विश्वविक्रम

🗓 १६ ऑगस्ट २०२५ |📍 ठाणे
प्रतिनिधी-नागेश पवार

संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी!

संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित "संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी" मध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर लावून विश्वविक्रमाची नोंद केली.

आज माझा मुलगा पुर्वेश याचे स्वप्न पूर्ण झाले. याचा मला आनंद आहे. या पथकाला २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून मानवी मनोरे रचून दिलेली ही सलामी संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे 🇮🇳
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री (महाराष्ट्र राज्य)

60
2722 views