
प्रतिभा फाउंडेशन नी मतिमंद शाळेत ध्वजारोहण करून केले मुलांना खाऊ वाटप आणि मार्गदर्शन.
यवतमाळ(रवी चरडे):- 15 ऑगस्ट 2025 रोजी नवजीवन सेवा संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय भोसा यवतमाळ येथे प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका इंजि. प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आले . तसेच त्याचे मध्ये लहान होऊन नृत्य सुद्धा केले,यावेळी सर्व मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुखदायी पाहण्यासारखा होता,यावेळी प्रतिभा फाउंडेशनचे डॉ. सुधा खडके मॅडम,सचिन शेळके अतुल पवार साधना पवार उपस्थित होते,स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला याआधी सुद्धा प्रतिभा फाउंडेशनने या विद्यालयांमध्ये आरोग्य शिबिर घेतलेले आहे आणि नेहमी सामाजिक कार्यात प्रतिभा फाउंडेशन सेवाभावी संस्था अग्रेसर राहते यानंतरही निवासी मतिमंद भोसा शाळेमध्ये फाउंडेशन द्वारे चांगले उपयुक्त उपक्रम राबित राहू असे आश्वासन फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभाताई पवार यांनी दिले, आणि फाउंडेशन च्या उपाध्यक्ष डॉ. सुधा खडके मॅडम आणि प्रतिभा पवार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून मार्गदर्शन केले, आणि 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.शेख रफिक सर, मान. शारीक शेख, सगीर भाई अन्सारी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच श्री रफिक सर यांच्या दोन्ही शाळेमध्ये प्रतिभा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान केल्याबद्दल फाउंडेशन नी रफिक सर व त्यांच्या सर्व टीमचे चे आभार मानले.