logo

मास्टरमार्डन्ड शाळेत स्वातंत्र्यदिन सोहळा आणि 'हर घर तिरंगा' संकल्प रॅलीचे शानदार आयोजन.

मास्टरमार्डन्ड शाळेत स्वातंत्र्यदिन सोहळा आणि 'हर घर तिरंगा' संकल्प रॅलीचे शानदार आयोजन.
पुणे निवासी संपादक उमेश पाटील 8530664576
पिंपरी-चिंचवड शहराचे विकासपुरुष दिवंगत लोकनेते आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शैक्षणिक नगरीतील नवी सांगवीच्या 'मास्टरमाईन्ड इंग्लिश मिडियम हायस्कूल' या अग्रगण्य शाळेत आपल्या देशाचा 79 वा ' स्वातंत्र्यदिन सोहळा ' आणि 'हर घर तिरंगा' या संकल्प रॅलीचे शानदार आयोजन करण्यात आले.शाळेसमोर आपल्या भारताचे राष्ट्रीय तिरंगा ध्वज प्रमुख पाहुणे संजय मराठे यांच्या हस्ते फडकवून मानवंदना देऊन विद्यार्थ्यां कडून राष्ट्रगीत गाऊन मग पुढे या रॅलीचे नियोजन करण्यात आले.

ही रॅली कृष्णा चौक - क्रांती चौक - फेमस चौक ते साई चौकाडून पुन्हा शाळेत अशी "भारत माता की जय" "वंदे मातरम् " या घोषणा देऊन व विद्यार्थ्यांनी संचलन केले.तेव्हा रॅलीमधे सांगवी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर यांनीही सहभाग घेतला आशा अतिशय नेत्रदिपक आणि दिमाखदार अशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कडलग,सुनिल बिरारी,सखाराम रेडेकर,तौफिक सय्यद,रमेश चौधरी,साई कोंढरे,रमेश गाढवे या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

स्वातंत्र्यदिना सारख्या राष्ट्रीय सणाबरोबरच सर्वच सामाजिक कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या अब्राहम सरांच्या या शाळेतील कार्यक्रमाचे व मुख्याध्यापिका राजपाल सहोता यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने केलेल्या अत्यंत सुनियोजित अशा या सोहळ्याचे शाळेतील पालकांसह परिसरीतील नागरिकांनी मनसुकता आनंद घेऊन शाळेचे कौतुक ही केले.

1
290 views