
अडावद पोलीस स्टेशन मार्फत नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात चित्रकला स्पर्धा संपन्न
जळगाव | प्रतिनिधी | दिनेश सोनवणे
अडावद ता चोपडा जि. जळगांव येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी अडावद पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्याच्या उद्देशाने ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. लहान गट व मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते बारावीच्या सुमारे 338 विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर, उप मुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ साहेब व त्यांचा स्टाफ स्पर्धा संपेपर्यंत शाळेत उपस्थित होते. स्पर्धा संपल्यानंतर लहान गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय तसेच मोठ्या गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. लहान गटातून प्रथम क्रमांक मुकुंद प्रेमराज पाटील, द्वितीय क्रमांक संस्कृती संदीप पाटील तृतीय क्रमांक सोहन कमलाकर भोई यांनी प्राप्त केला. मोठ्या गटातून प्रसाद ईश्वरदास पिंगळे प्रथम क्रमांक, कशिश विजय राजपूत द्वितीय क्रमांक, इशरत शेख शरीफ तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेनंतर लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग चोपडा हे उपस्थित होते. मंचावर मा श्री प्रमोद वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक अडावद पोलीस स्टेशन अडावद, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस आर बोरसे मॅडम, श्री एस ए सावळे सर, श्री के एस सावकारे सर, सौ एम एन भारुडे मॅडम व अडावद पोलीस स्टेशन चा स्टाफ विजयी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. विद्यालयाच्या वतीने अण्णासाहेब घोलप, प्रमोद जी वाघ यांचा स्वागत सत्कार करण्यात आला अडावद पोलीस स्टेशन मार्फत ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस आर बोरसे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांसमवेत त्यांचे पालक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक श्री प्रमोद वाघ यांनी केले. तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले व्यसनाधीनतेचे प्रमाण, अमली पदार्थांचे होणारे दुष्परिणाम याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांनी आपल्या मनोगतातून अडावद पोलीस स्टेशनचे आम्हाला नेहमी सहकार्य असते, तसेच तरुणांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलिसांमार्फत ही चित्रकला स्पर्धा राबवली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब घोलप पोलीस उपविभागीय अधिकारी चोपडा भाग चोपडा यांनी आपल्या मनोगतातून तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे, व्यसनाने जीवनाची दुर्दशा कशी होते हे सांगून विद्यालयाने आम्हाला स्पर्धा घेण्यासाठी अनुमती दिली व स्पर्धा घेतली त्याबद्दल विद्यालयाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सी जी परदेशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री के आर कणखरे सर यांनी केले. यानंतर शाळेपासून अडावद बस स्थानका पर्यंत रॅली काढण्यात आली, बस स्थानकावर अमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री एस आर महाजन सर व श्री एस डी खोडपे सर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे सहकार्य मिळाले.