logo

साहित्य क्षेत्रातील मानाचा बहुमान-हिरामण सोनवणे यांची ऐतिहासिक निवड

साहित्य क्षेत्रातील मानाचा बहुमान-हिरामण सोनवणे यांची ऐतिहासिक निवड

धुळे प्रतिनिधी
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील सुप्रसिध्द कलाशिक्षक, कवी , लेखक मा. हिरामण सोनवणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धुळे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र ऑनलाईन दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक, सुप्रसिद्ध कवी, लेखक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते, फिल्म अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार डॉ. शरद गोरे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. कवी /लेखक हिरामण सोनवणे यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविला आहे. अवघ्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या नवोदित साहित्यिकांना घडविण्याचे कार्य सध्या आपल्या संचालक मंडळा सोबत त्यांच्या अविरतपणे करत आहेत. या भरीव कामगिरीची दखल घेऊन देशभरात आणि विदेशातही पोहचलेली नामवंत संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने यांची " धुळे जिल्हाध्यक्ष " पदावर नियुक्ती केली आहे. सदर पदाचा कार्यकाळ दि. ३१/१२/२०२८ पर्यंत राहील. आपल्या कार्यकुशलतेने समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत संस्थेमार्फत परीषदेचे कार्य अखंड साहित्यिक सेवा करत राहण्याची जबाबदारी सांभाळत सुदृढ समाज स्वास्थ्य राहील यासाठी अविरतपणे कार्य करत राहाल अशी अपेक्षा केली जात आहे. आपल्या कार्याद्वारे सात्त्विक सुविचारांची पेरण करून समानतेचा मळा फुलवाल ही खात्री आहे. आपणास नवीन जबाबदारीच्या आभाळभर शुभेच्छा देण्यात येत आहेत. आपल्या मनोमंदिराच्या गाभाऱ्यात सद्विचारांची सार्थकता अढळ राहो हीच सदिच्छा राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक डॉ. शरद गोरे साहेब यांनी व्यक्त केली आहे! सदर निवडीबाबत सर्व स्तरातील स्नेही परिवार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय, राज्य संचालक मंडळ आणि धुळे जिल्हा संचालक मंडळ, समूहातील सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ सारस्वत बंधू भगिनी, कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, उपाध्यक्षा, सौ. हौसाताई तुकाराम महाजन, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, सौ. सरलाताई एकनाथ महाजन, जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी ब्राम्हणवेलचे सर्व संचालक मंडळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मा. अण्णासाहेब कैलास भिका महाजन, सर्व समिती सदस्य, मुख्याध्यापक मा. अण्णासाहेब माळी बी. एन., सर्व सहकारी माजी शिक्षक, जेष्ठ शिक्षक श्री. माळी के. एन., श्री. निकुंभ बी.एस., श्री. रविंद्र सुर्यवंशी, श्री. प्रमोद महाजन, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई, श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, मित्र मंडळाच्या वतीने सुप्रसिद्ध कवी/लेखक कलाशिक्षक मा. हिरामण सोनवणे यांचे हार्दिक शुभेच्छा देऊन अवघ्या महाराष्ट्रातील कवी/ कवयित्री,लेखक/लेखिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे!

15
395 views