थेपडे विद्यालयात दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा
आज दिनांक 16 /8/ 2025 रोजी स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता जि जळगाव विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यात इयत्ता 11वी व 12 वी (जुनिअर कॉलेज सकाळ विभाग) व इयत्ता पाचवी ते दहावी दुपार विभाग च्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून श्रीकृष्णाच्या गाण्यांवर नृत्य केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दहीहंडीचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर उप मुख्याध्यापक जी डी बच्छाव सर यांनी केले. विद्यार्थी विद्यार्थिनी सोबत शिक्षकांनी देखील श्रीकृष्णाच्या गीतांवर नृत्याचा आनंद घेतला सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.