logo

पुणे -आळंदी -20-08-2025.. इंद्रायणी नदीच्या पुरामुळे भक्त पुंडलिक मंदिर, आणि भक्ती सोपान पूल पाण्याखाली.

महाराष्ट्रात गेल्या चार-पाच दिवसापासून अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आलेला आहे, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील मावळ व इतर धरण परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत मोठी वाढ झालेली असल्यामुळे नदीला पुर आलेला आहे त्यामुळे इंद्रायणी नदीतील संत पुंडलिक महाराज यांचे मंदिर आणि भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेले आहेत, पोलीस प्रशासन, तसेच नगरपालिकेतील कर्मचारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत
त्याचप्रमाणे शनी मंदिरातील परिसरातील दुकाने यांना सूचना देऊन बंद करण्यात आलेले आहेत,मावळात अतिवृष्टी झाल्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे त्याचप्रमाणे आळंदी येथील जुना पूल रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहे, चाकण चौकात एक वाहन बंद पडल्यामुळे ट्रॅफिक झाली होती याची तत्परता राखून चाकण चौकात तैनात असलेले पोलीस व महिला पोलीस अपर्णा तापकीर, संगीता भाकरे,लांडगे, रोहिणी, लांडे, वंदना गव्हाणे,नर्मदा मिलखे,यांनी बंद पडलेले वाहन ढकलून ट्राफिक पूर्ववत केले त्यांचे सगळीकडेच कौतुक होत आहे, इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी नदीच्या पात्रात उतरू नये तसेच इंद्रायणी नदीच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे,व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आळंदी नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे
ब्युरोची चीफ - जे.के. सोनवणे

133
11432 views
2 comment  
  • Ajit Nivrutti Chahane

    १६ तासांहून अधिक काळ ड्युटीवर राहिल्यामुळे सिक्युरिटी गार्डचे हाल; चालता चालता थेट पडला रुळावर अन्… VIDEO तून बघा पुढे काय घडलं Metro Station Viral Video : एकाच ठिकाणी बसून, डोळ्यांत तेल घालून सतत देखरेख करणे यांच्यासाठीही कठीणच जात असेल ना...एखादी बिल्डिंग असो, ऑफिस असो किंवा एखादे मेट्रो स्टेशन देखरेख करण्यासाठी इथे सुरक्षा रक्षक नेमून दिलेले असतात. एकाच ठिकाणी बसून, डोळ्यांत तेल घालून सतत देखरेख करणे यांच्यासाठीही कठीणच जात असेल ना. कधी कधी तर एखाद्या खास कार्यक्रम असेल तर यांना वाढीव ड्युटी सुद्धा करावी लागते. तर आज असेच काहीसे बंगळुरूच्या सुरक्षा रक्षकाबरोबर घडले.बंगळुरूच्या मेट्रो यलो लाईनवरील रागीगुड्डा मेट्रो स्टेशन क्रमांक २ वर तैनात असलेला सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना अचानक मेट्रोच्या रुळांवर पडला. ५२ वर्षीय सुरक्षा रक्षक, जो त्याच्या कामाच्या वेळेत प्लॅटफॉर्मवर सहज चालत होता. चालत चालत त्याचा डोळा लागला की काय माहिती नाही पण, हळूहळू तो प्लॅटफॉर्मवरून चालत चालत थेट खाली रुळांवर पडला. रुळांवर पडताच त्याला शुद्ध आली आणि तो घाबरून गेला. प्लॅटफॉर्मवर पुन्हा येण्यासाठी त्याने तेथील प्रवाशाला हाक मारली आणि मदतीची विनंती केली.त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील सुरक्षा रक्षकाने इमर्जन्सी ट्रिप स्विच (ETS) सक्रिय केला, ज्यामुळे ट्रॅकवरील वीज खंडित झाली. प्लॅटफॉर्मवर उपस्थित एका प्रवाशाने गार्डला मदत करण्यासाठी धाव घेतली आणि त्याला वर खेचले; त्यामुळे गार्डला कोणतीही दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. आपत्कालीन ट्रिप स्विच सक्रिय केल्यामुळे, मेट्रो सेवा सुमारे सहा मिनिटांसाठी थांबल्या आणि विस्कळीत झाल्या. द हिंदूच्या वृत्तानुसार, सुरक्षा रक्षक १६ तासांहून अधिक काळ ड्युटीवर होता; त्यामुळे ही घटना घडली. कामावर येण्यापूर्वी त्याने थोडाच वेळ विश्रांती घेतली होती.

  • Ajit Nivrutti Chahane

    Aima media जण जण की आवाज दिनांक : 27/08/2025 Am 11:00 Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी: गणेश चतुर्थीच्या मुहूर Aima media जण जण की आवाज दिनांक : 27/08/2025 Am 11:00 Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुणेरी मेट्रो प्रथमच हिंजवडीतून बाहेर दररोज हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे : दररोज हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची पहिली चाचणी जुलैमध्ये यशस्वीपणे पार पडली होती. गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर आज पुणेरी मेट्रो प्रथमच हिंजवडीतून बाहेर पडली. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोची माण डेपोपासून ते बालेवाडी स्टेडियम येथील स्टेशन क्रमांक १० पर्यंत दुसरी चाचणी आज यशस्वीपणे पार पडली. या मेट्रो मार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. सुरुवातीला जमीन भूसंपादनातील अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे काम पुढे ढकलले गेले होते. तब्बल २३.३ किमी लांबीच्या या मार्गामुळे दररोज वाढत जाणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. माण डेपो ते पीएमआर-४ स्टेशन दरम्यान पहिली चाचणी जुलै महिन्यात यशस्वीरीत्या पार पडली आहे. या मार्गावर एकूण २३ स्थानके असणार असून शहरातून हिंजवडीला कामासाठी जाणाऱ्या नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये सध्या एक लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. चार गाड्या दाखल हा मार्ग भारतातील पहिला सार्वजनिक-खाजगी भागीदारीत ( पीपीपी) उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प आहे. टाटा व सिमेन्स या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या नावाने प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू झाले होते. आतापर्यंत प्रकल्पासाठी चार मेट्रो रेलगाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक गाडीत सुमारे एक हजार प्रवासी प्रवास करू शकणार असून ८० किमी प्रतितास या वेगाने गाड्या धावणार आहेत. शेवटच्या टप्प्यातील सुविधा महत्त्वाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम वेगाने पूर्ण होणे वाहतुकीच्या समस्यांवर उपाय ठरणार आहे. मात्र केवळ मेट्रो मार्ग सुरू करणे पुरेसे ठरणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी ई-रिक्शा, फीडर बस आणि रिक्षा अशा शेवटच्या टप्प्यातील (लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी) सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा, प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी आणि खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात फारसा फरक पडणार नाही. यासाठी प्रभावी नियोजन करून सुरक्षित व सोयीस्कर सुविधा देणे आवश्यक आहे.