logo

*लोणंदच्या धावपटूंची नशा मुक्तीसाठी हिल मॅरेथॉनमध्ये दमदार दौड*

*लोणंदच्या धावपटूंची नशा मुक्तीसाठी हिल मॅरेथॉनमध्ये दमदार दौड*
प्रतिनिधी =श्री.दिलीप वाघमारे लोणंद.
भैरवनाथ डोंगरावर रंगली २ किमी हिल रन स्पर्धा
साहिल पांढरे, आर्य निंबाळकर, रोहित निंबाळकर ठरले विजेते.
*लोणंद*-सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत लोणंद पोलीस स्टेशन लोणंद यांच्या वतीने भैरवनाथ डोंगर ग्रुप , रनर्स ग्रुप , मयुरेश्वर ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजीत केलेल्या नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया हा उपक्रमाला उत्सुर्त प्रतिसाद मिळाला .
लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगरावर हिल रन मॅरेथॉन घेण्यात आली . त्यामध्ये भैरवनाथ डोंगर पळत चढने व पळत उतरणे ही सुमारे 2 किलोमिटर अंतराची मॅरेथॉन सर्व स्पर्धकांनी पूर्ण केली .
स्पर्धेला डोंगराच्या पायथ्यापासून सुरुवात करण्यात आली .
या स्पर्धेत युवा गटात प्रथम साहिल पांढरे , द्वितीय यश फरांदे , तृतीय साई काकडे ,लहान गटात प्रथम क्रमांक कु.आर्य रोहित निंबाळकर , द्वितीय क्रमांक कु. आरूष अमोल बुनगे , तृतीय क्रमांक कुमारी राजमुद्रा शंभूराज भोसले , मोठ्या गटात प्रथम क्रमांक रोहित निंबाळकर , द्वितीय क्रमांक इरफान मोकाशी ,तृतीय क्रमांक भगवान चव्हाण ,उत्तेजनार्थ सहदेव गोरड , शिवाजीराव शेंडगे यांना बक्षीसे देण्यात आली .
स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते .
स्पर्धेतील विजेत्यांना सपोनि सुशील भोसले साहेब यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले . यावेळी नशा मुक्त भारत अंतर्गत डोंगरावर हिल रन मॅरेथॉन केल्याबद्दल भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने सपोनि सुशील भोसले यांचा रानफुलांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला .
भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने गेल्या 8 वर्षात डोंगरावर सुमारे 200 झाडे लावून त्याचे यशस्वी संगोपन केल्याबद्दल उपस्थितीतांनी त्यांनी कौतुक केले .
यावेळी लोणंद पोलीस स्टेशन मधील पोलीस जवान भैरवनाथ डोंगर ग्रुप ,लोणंद रनर्स , मयुरेश्वर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते .
मुख्यसंपादक = शौकत शेख.

13
760 views