logo

21 ऑगस्ट ला नागभीड येथे नूपूर शर्मा व आमदार चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम : वाहतुकीत तात्पुरते बदल लागू

पोलिसांचा वाहतूक आराखडा जाहीर


नागभीड : भाजपाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या व प्रखर राष्ट्रवादी नेत्या नूपूर शर्मा व भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा आमदार चित्र वाघ यांच्या उपस्थितीत नागभीड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड येथे दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन नागभीड तालुका भाजप महिला आघाडी तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असतो. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने वाहतुकीत काही तात्पुरते बदल केले आहेत.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत दिलेल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार,

कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड ते तर्वेकर पेट्रोल पंप हा मार्ग दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 या वेळेत एकमार्गी वाहतुकीसाठी खुला राहील.

यावेळी नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कामांशिवाय संबंधित मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. गर्दीमुळे अपघात अथवा कायदा-सुव्यवस्थेची समस्या उद्भवू नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. आवश्यकतेनुसार या अधिसूचनेत बदल करण्यात येईल, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आयोजक : भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी, तालुका नागभीड

विनीत : किर्तीकुमार (बंटी) भांगडिया, आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र

9
192 views