logo

anoj Jarange : मनोज जरांगेंना मुंबईतील आंदोलनास सशर्त परवानगी; जरांगे म्हणाले - मागण्याही एका दिवसांत मान्य करा

मनोज जरांगे काय म्हणाले?

आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली असेल, तर कायद्याचे सर्व नियम आम्ही नक्की पाळू. माझा समाज देखील सर्व नियम पाळणार. कायद्याच्या नियमाबाहेर बाहेर जाणार नाही. ती ऑर्डर काय आहे ते मला माहीत नाही. पण मी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपोषणाला बसणार आहे. आम्ही हट्टी नाहीत, त्यांनी जे सांगितले त्या निर्णयांचे मराठ्यांकडून तंतोतंत पालन होणार. पण एक दिवसाचे नाही, तर बेमुदत. मी आता त्यावर प्रतिक्रिया देत नाही. संध्याकाळी शिवनेरी गडावर गेल्यानंतर पूर्ण ऑर्डर बघतो. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देतो, असे मनोज जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारचे आणि न्यायालयाचे मनापासून आभार देखील मानले.Manoj Jarange

…तर मागण्याही एका दिवसांत पूर्ण करा

एका दिवसात उपोषण कसे करायचे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली. एका दिवसाची परवानगी दिली, तर आमच्या एका मागण्या एका दिवसांत मंजूर करा. तुम्ही जोपर्यंत मागण्या मंजूर करत नाहीत, तोपर्यंत मी उपोषणाला बसणार, असेही मनोज जरांगे म्हणाले. आमच्या मागण्या आत्ता मान्य करा, लगेच गुलालाच्या ट्रक भरतो. तीन लाख ट्रक आणण्याचा शब्द दिलेला आहे. नाही आणल्या तर नाव बदलून ठेवीन. तीन लाख ट्रक गुलालाने मुख्यमंत्र्यांचा बंगला बुजवून टाकतो, असेही जरांगे म्हणाले.

आंदोलनासाठी पोलिसांनी घातलेल्या मुख्य अटी आणि शर्ती

आमरण उपोषण अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना.

ज्याअर्थी, आपण दि.२९/०८/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांची राज्य सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून आपण आंदोलन/ आमरण उपोषण करणार आहात, त्याचे परवानगीसाठी दि. २६/०८/२०२५ रोजीचे पत्राद्वारे विनंती केली आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क वर्ष ११, अंक ३०) मंगळवार, ऑगस्ट २६, २०२५ भाद्रपद ४, शके १९४७, असाधारण क्रमांक ४५, प्रधिकृत प्रकाशन अन्वये जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम २०२५ नुसार आंदोलकांना सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे, मेळावे, मिरवणुका इत्यादीसाठी आझाद मैदान (राखीव भाग), निश्चित करण्यात आला आहे. नमुद नियमावली मध्ये आझाद मैदान या ठिकाणाची निश्चिती रहिवाशांना, रहदारीला, कमीत कमी अडथळा होण्याचे आणि विनियमित केलेल्या रीतीने निदर्शकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्याचे तत्व विचारात घेवून करण्यात आले आहे.

2
38 views