logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी सलग तीन शाळांना मानसिक आरोग्य अंतर्गत मार्गदर्शन*

*रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी सलग तीन शाळांना मानसिक आरोग्य अंतर्गत मार्गदर्शन*

रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी कै बाळासाहेब के एस पवार माध्यमिक विद्यालय खडकदेवळा येथे शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असे
*सशक्त मन आणि उत्तम भविष्य* यासहित *तानतणाव व्यवस्थापन* विषयावर रो डॉ प्रशांत सांगडे आणि रोटरी क्लब अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, सदस्य चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर, भरत सिनकर, चंद्रकांत पाटील, डॉ कुणाल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक गरुड सर, शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना रोटरीच्या युथ एक्सचेंज बद्द्ल अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी माहिती सांगितली. रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी शालेय विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य अभियान अंतर्गत सलग तीन कार्यक्रम घेऊन प्रबोधन केले. अशा अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

64
1763 views

Comment